पनवेल मनपा हद्दीत कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांत मोठी वाढ; खारघर परिसरात आढळले एकूण १७ रुग्ण
पनवेल: आज दि. ६ जून रोजी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांत अचानक मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज येथे नव्याने एकूण ५६ पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवार ८ जून पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणण्यात आली आहे आणि तत्पूर्वीच अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण सापडणे नक्कीच चिंतेची बाब आहे. यात सर्वात जास्त १७ रुग्ण खारघर विभागात आढळून आले असून येथे एकाच घरातील ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल कामोठे १६, कळंबोली १६, पनवेल ३, नवीन पनवेल २ व खांदा कॉलनी २ अशा क्रमाने रुग्णांची नोंद झाली आहे. आज १९ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले असून एकूण रुग्ण संख्या २८० वर पोहोचली आहे.
Press Note of Date 06/06/2020 pic.twitter.com/d61X7LSwFL
— Panvel Municipal Corporation (@PanvelCorp) June 6, 2020
