गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनामुक्त; म्हणाले, “पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. आज त्यांना इस्पितळातून घरी पाठवण्यात येणार आहे. या संदसर्भातील माहिती त्यांनी फेसबुक च्या माध्यमातून सर्वांना दिली. यावेळी त्यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे व मिलिंद नार्वेकर यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली.
जवळपास महिनाभर जितेंद्र आव्हाड कोरोनाशी लढत होते तर आणखी पुढील १ महिना त्यांना पूर्ण आराम करावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
