CMO Tweet on Jalyukt Shivar
राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ साठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड
महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ मध्ये महाराष्ट्राला विविध गटामध्ये १० पुरस्कार मिळाल्याची घोषणा केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने केली आहे.
केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ मध्ये महाराष्ट्राने जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील १६ हजार गावे जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीमय झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई दूर झाली आहे.
राष्ट्रीय जल पुरस्कार पुढील प्रमाणे;-
१. सर्वोत्कृष्ट जिल्हा भूजल पुनरुज्जीवन प्रथम क्रमांक –
अहमदनगर
२. नदी पुनरुत्थान प्रथम क्रमांक – लातूर, द्वितीय – वर्धा
३. जलस्रोतांचे पुनरुत्थान प्रथम क्रमांक – बीड
४. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – महुद (बु) जिल्हा सोलापूर
५. जलसंधारण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संशोधन, कल्पना व नव तंत्रज्ञान वापर – सदभावना भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा
६. प्रसार – प्रथम क्रमांक – जनता दरबार दूरदर्शन
७. जलसंधारण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणारी शाळा – द्वितीय क्रमांक – एस. जी. गल्स स्कुल, जाऊ, निलंगा तालुका, जिल्हा लातूर
८. उत्कृष्ट प्रसार वर्तमान पत्र – प्रथम क्रमांक महाराष्ट्र सिंचन विकास पुणे, द्वितीय क्रमांक – लोकमत
९. उत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
