Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Budget 1 (1)

संसदेत आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुक होण्याआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधित करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

लोकसभा निवडणुक होण्यापूर्वी मोदी सरकार शेवटचा अर्थसंकल्प उद्या मांडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमवर या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी सरकार अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरु होऊन १३ फेब्रुवारीला संपणार आहे. लोकसभेेच्या निवडणूका एप्रिल, मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारची स्थापना मे अखेरपर्यंत होईल. मात्र पुढील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा अंतरिम अर्थसंकल्पातही मांडला जाईल. निवडणुकीनंतर सत्तेत येणारं नवीन सरकार जुलैमध्ये संपूर्ण बजेट सादर करणार आहे.

कॅन्सरच्या उपचारांसाठी अरुण जेटली परदेशी गेल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्याआधी पाच वेळा अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *