Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ

Gandhi 1

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ

“भारत हिंदू महासभे”ची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पाण्डेय हिने उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचा अपमान केला. नथुराम गोडसेने आजच्याच दिवशी गांधीजींना गोळ्या मारून त्यांची हत्या केली होती. अलिगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोच प्रसंग परत उभा करण्यासाठी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७१ वी पुण्यतिथी.

पुण्यतिथीच्या दिवशी बापूजींच्या प्रतिमेला हार वाहायचे सोडून हिंदू महासभेच्या पूजा पाण्डेय हिने त्यांच्या प्रतिमेलाच गोळ्या घालतल्या. याशिवाय ही हत्या खरी वाटावी म्हणून या विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं. त्यानंतर गांधींची प्रतिमाही या कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. महात्मा गांधींची हत्या ज्या नथुराम गोडसेने केली त्याच्या जयजयकाराचे नारेही यावेळी देण्यात आले. नथुरामच्या जन्मदिवसाच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटण्याचा कार्यक्रम केला होता.

या कार्यक्रमाचं आयोजन “भारत हिंदू महासभे”ची राष्ट्रीय सचिव पूजा पाण्डेय हिने केले होते. विकृतांनी केलेल्या या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून पूजा पाण्डेय हिचा निषेध केला जात आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *