Deepika Padukon Tw 2
अभिनेत्री दिपीका पादुकोणची निवड मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी करण्यात आली आहे. यापूर्वी ‘मामि’च्या अध्यक्ष अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव होत्या. त्यानंतर आता या पदाची जबाबदारी दिपीका पार पाडणार आहे. ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिपीकाने साऱ्यांचे आभार मानले.
आगामी चित्रपटांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे किरण राव यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरण राव यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली. मंडळाच्या या बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदान करण्यात आलं. यामध्ये दिपीकाला सर्वाधिक मतं मिळाली.
सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून दिपीकाची ओळख आहे. बॉक्स ऑफिसवर गेल्या वर्षभरापासून दिपीकाचे अनेक चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर दिपीकाचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे.
