Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तुमच्याही चिक्की-मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, भावाचं बहिणीला आव्हान

तुमच्याही चिक्की-मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, भावाचं बहिणीला आव्हान

बीड: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामधील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा रंगलं आहे.

माझ्या अध्यक्षतेखाली तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी होऊ द्या, एकदाच दूध का दूध और पानी का पानी होवू द्या, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे.

जर विरोधी पक्षनेता म्हणून मी काही चुकीचं काम केलं असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करा आणि माझी काय चौकशी करायची असेल ती करा. त्यासोबत तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या. एकदाच दूध का दूध और पानी का पानी होऊ द्या, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.

तुम्ही लहान लेकरांच्या चिक्कीत खाता, मोबाईलमध्ये खाता, मग मुंडे साहेबांचा वारसा हाच चालवता का? असा बोचरा सवालही धनंजय मुंडेंनी पंकजा यांना विचारला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *