उर्मिला मातोंडकर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
“आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस, मी आज सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे. मी व माझे कुटुंब महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विचारधारेला मानणारे आहोत. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे पक्षात प्रवेश केला” असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असून त्यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. मिलिंद देवरा, संजय निरुपम, अस्लम शेख, भूषण हे आज सकाळी उर्मिला मातोंडकर समवेत दिल्लीला गेले होते.
