Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लग्नाला यायचं हं! ‘वेडिंग चा शिनेमा’चा ट्रेलर आज प्रदर्शित

Featured Video Play Icon

लग्नाला यायचं हं! ‘वेडिंग चा शिनेमा’चा ट्रेलर आज प्रदर्शित

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबातील लग्नसोहळा आणि त्यावेळी घडणारी गंमत जंमत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. लग्न म्हटल्यावर त्यासोबत तयारी, घरातील लगीन घाई, नातेवाईकांमधील रूसवे-फुगवे या सगळ्या गोष्टी आल्याच म्हणून समजाव्यात. त्यात आता भर पडलीय ती प्री-वेडिंग फोटोशूट आणि व्हिडिओची… या सगळ्या बदलांशी जुळवून घेताना कुटुंबाची उडणारी धांदल, सगळं कुटुंब एकत्र आल्यावर घरात उडणारा गोंधळ हा सगळा ‘सोहळा’ ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे हे आघाडीचे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या साऱ्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *