ईशान्य मुंबईतून भाजपच्या या उमेदवाराला मिळणार तिकीट?
मुंबई: लोकसभा निवडणुक तोंडावर येथून ठेपली असून शिवेसना-भाजप युतीच्या ईशान्य मुंबईच्या जागेच्या तिढा अजूनही कायम आहे. भाजपचे किरीट सोमय्यांना यांना शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांचं नाव शर्यतीत सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभेसाठी पक्षाकडून मनोज कोटक यांच्या नावाची अद्याप तरी अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही.
ईशान्य मुंबईतून कोणाच्या नावावर शिकामोर्तब करायचा याचा अंतिम निर्णय संसदीय केंद्रीय समिती करणार आहे.
भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील, असं मत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी मांडले होतं.
मनोज कोटक गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
