१५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची निवडणूक आयोगाला मुभा
नवी दिल्ली/मुंबई, दि. १२: राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हापरिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. उर्वरित २० जिल्हापरिषदांच्या निवडणुकांच्या संदर्भात २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
Source – AIR
