पदाचा गैरवापर केल्याचा ठपका असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आम आदमी पक्षाने(आप) टिळक रस्त्यावर पुरम येथे निदर्शने केली. गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना बापट पाठीशी घालत असूनही मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही ह्यावेळी आप तर्फे करण्यात आला. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत ह्यांनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले.