दुसऱ्या टप्पात राज्यातील १० मतदारसंघात मतदान
राज्यात दहा मतदारसंघांमध्ये गुरुवारी, १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे.
मराठवाड्यात नांदेड, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद विदर्भात अमरावती, बुलढाणा, अकोला आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. तर गुरुवार २३ मे २०१९ रोजी निवडणुकांचे निकाल लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती;-
१) नांदेड: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध युतीचे प्रताप पाटील
२) बीड: शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे
३) उस्मानाबाद: शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील
४) अमरावती: शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ विरुद्ध युवा स्वाभिमान पार्टीच्या नवनीत राणा
५) अकोला: भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे विरुद्ध काँग्रेसने हिदायत पटेल तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
६) सोलापूर: काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी
