“हिंदूंना भाजपानं पूर्ण संकटात आणलं आहे” – सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी
मुंबई, दि. २१ : सामाजिक कार्यकर्ते व निर्भय बनो आंदोलनाचे प्रमुख विश्वंभर चौधरी हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. त्यातही विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिका व धोरणांवर वेळोवेळी ते टीकेचे असूद ओढत असतात. हिंदू खतरे में है हि टॅग लाईन धरून कथितरीत्या भाजप जे राजकारण करत आहे त्यावर चौधरी यांनी फेसबुक या समाजमाध्यमावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत विश्वंभर चौधरी :
हिंदू खरोखरच कधी नव्हता एवढा खतरेंमे आहे हे मान्य करावं लागेल. हिंदूंना भाजपानं पूर्ण संकटात आणलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला गेला. प्रत्यक्ष शंकराचार्यांना पवित्र गंगास्नानापासून अडवण्यात आलं. त्यांच्या सोबतच्या भगव्या वस्त्रधारी संन्याशांना मारहाण, धक्काबुक्की करण्यात आली.काशीतली शेकडो अतिप्राचीन मंदीरं बुलडोझर लावून पाडली गेली. काॅरिडाॅर करण्याच्या नावाखाली.मध्यप्रदेशातील हिंदू दुषित पाण्यानं मरत आहेत. दिल्लीतले हिंदू हवा प्रदूषणानं मरत आहेत. पुण्या-मुंबईतले हिंदू प्रत्येक सणाला डीजे सहन करत ध्वनी प्रदूषण झेलत आहेत.अमर्त्य सेन नावाचा नोबेल विजेता बंगाली हिंदू आपण या देशाचे नागरिक आहोत की नाही या संभ्रमात पडला आहे.हिंदू शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व आत्महत्या चालल्यात महाराष्ट्रात. खरंच हिंदू इतका खतरें में कधीच आला नव्हता या देशात.
