Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video : पाहा बहुचर्चित चित्रपट ‘कलंक’ चा ट्रेलर

Featured Video Play Icon

Video : पाहा बहुचर्चित चित्रपट ‘कलंक’ चा ट्रेलर

‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज नुकताच प्रदर्शित झाला. धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’चा टीजर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. १५ मार्चला ‘कलंक’चे पहिले पोस्टर रिलीज झाले होते. यानंतर आलेल्या ‘कलंक’च्या टीजरने तर चाहत्यांचा उत्साहात आणखीनच भर टाकली होती.

ट्रेलरवरून हा चित्रपट हिंदू-मुस्लिम वादावर आधारित असल्याचे जाणवते. ८० कोटी रुपए खर्चून बनवलेला हा चित्रपट अगदी शूटींग सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आदित्य राय कपूर, संजय दत्त, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा असे दमदार कलाकार आहेत. त्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ च्या सुमारास सुचली होती असे करणने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण आता या चित्रपटाची कथा एका पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट व्हॉट द बॉडी रिमेम्बर्स या पुस्तकावर आधारित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *