Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज ४६वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्याविषयी

डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज ४६वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्याविषयी

भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक, कोरिओग्राफर, डान्सर प्रभुदेवा याचा जन्म ३ एप्रिल १९७३ मध्ये कर्नाटकमधील म्हैसूर या ठिकाणी झाला. प्रभुदेवाने आजवर दाक्षिणात्य, हिंदी व अन्य भाषांमधील चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.

‘भारतीय मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभुदेवाने १३ चित्रपटांचं दिग्दर्शन आणि चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रभुदेवाने हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांत काम केले आहे. प्रभुदेवाचे वडील दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच प्रभुदेवाने नृत्याचे धडे घेतले.

प्रभु देवाचे पूर्ण नाव प्रभुदेवा सुंदरम असे आहे. प्रभु देवाने धर्मराज आणि उदुपी लक्ष्मीनारायण यांच्‍याकडून भरतनाट्यमचे धडे घेतले. प्रभु देवाने कोरिओग्राफर म्‍हणून कमल हसनसोबत पहिला चित्रपट ‘वेत्री विजा’मध्‍ये काम केले.

प्रभु देवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्‍सिंगने केली. त्‍यानंतर त्‍याने अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर तो दिग्‍दर्शक आणि चित्रपट निर्माताही बनला. प्रभु देवाने तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट दिग्‍दर्शित केले. ‘वॉन्टेड’, ‘राउडी राठौड’, ‘रमैया वस्तावैय्या’ आणि ‘ॲक्शन जॅक्सन’ यासारखे हिंदी चित्रपट हिट ठरले. प्रभु देवा दिग्‍दर्शित ‘ॲक्शन जॅक्सन’मधील थीम सॉन्‍गवर अजय देवगणला प्रभु देवाने डान्स शिकवला.

प्रभु देवाला चित्रपट ‘मिन्‍सारा कनावु’ (१९९७) आणि ‘लक्ष्‍य’ (२००४) साठी दोन वेळा राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *