Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खमंग रेसिपी : बनवा झटपट आवळ्याचे लोणचे घरच्या घरी

खमंग रेसिपी : बनवा झटपट आवळ्याचे लोणचे घरच्या घरी

साहित्य:
१० ते १२ आवळे,
पाव चमचा मेथी पावडर, १ चमचा मोहोरी,
२ चमचे मोहोरी डाळ,
चिमूटभर हळद,
१ ते २ चमचा साखर,
मीठ चवीप्रमाणे,
अर्धी वाटी पाणी, तेल, अर्धा चमचा हिंग.

कृती:

सर्व प्रथम आवळे धुवून कुकरमध्ये अर्धी वाटी पाण्यात शिजवून घ्यावेत. १ शिट्टी झाली की गॅस लगेच बंद करावा. आवळे कच्चट चांगले लागतात.

थंड झाल्यावर आवळे कुकरमधून काढून घ्यावे. त्यातले पाणी नीट बाजूला ठेवावे. आवळ्यातल्या बीया काढून टाकाव्यात. आता आवळे ज्या पाण्यात शिजवले त्याच पाण्यात आपल्याला १ चमचा मोहरी फेसून घ्यावी. त्यासाठी कोरड्या मिक्सरमधून आधी मोहरी थोडी वाटून घ्यावी. नंतर त्यातच हे पाणी घालून परत मिक्सरमध्ये फिरवा.

नंतर आवळ्याच्या फोडींवर हे मिश्रण ओता. चवीप्रमाणे मीठ टाका. थोडी साखर घाला. गोड चव आवडत नसल्यास साखर वगळा. नंतर पाव वाटी तेलात थोडी मोहरी, पाव चमचा मेथी पावडर, भरपूर हिंग, चिमूटभर हळद असं घालून छान फोडणी द्या. नंतर ही फोडणी व्यवस्थित गार झाल्यावर लोणच्यावर ओता. लोणचं खाण्यासाठी तयार.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *