Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video : पाहा अजय-तब्बूचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर

Featured Video Play Icon

Video : पाहा अजय-तब्बूचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू आणि रकुल प्रीत सिंहही झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी समीक्षक तरण आदर्श यांनी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडीवर आधारित आहे.

या ट्रेलरची सुरूवात अजयसोबत जावेद जाफरी यांच्याशी बोलताना होत आहे. या ट्रेलरमध्ये असे दिसते की, अजय देवगण चित्रपटामध्ये त्याच्यापेक्षा वयाने २६ वर्ष लहान असणाऱ्या मुलीच्या प्रेमामध्ये पडतो. अजयला रकुल प्रीत आवडत आहे. परंतु, जेव्हा ते रकुल घेवून घरी येतात. त्यावेळी त्याची पहिली पत्नी मंजू आणि मुले आयशा ही रकुल प्रीतच्या वयाची असल्याचे दिसत आहे. यानंतर अजयने करीना कपूर आणि सैफ यांचे डेट करण्याचे उदाहरण जावेद जाफरी यांना दिले आहे.

अजयची पूर्वाश्रमीची पत्नी तब्बू यांचा हा कॉमेडी ड्रामा पाहण्यास नक्कीच मजा येईल असे ट्रेलरवरून वाटत आहे. अवघ्या काही तासांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. ३ मिनिट १७ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कॉमेडीचा तडका चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा लव रंजन याने लिहिली आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाची पटकथाही लव रंजन याने लिहिली होती. या चित्रपटात अजय, तब्बू आणि रकुलसोबत जिमी शेरगिल आणि अलोकनाथ दिसणार आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची कथाही तगडी आहे असे दिसत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *