Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच सापडली १.८ कोटींची रोकड, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच सापडली १.८ कोटींची रोकड, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेशमध्ये भाजप पैसे देऊन मत विकत घेतात असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत केला आहे. तसेच त्यांनी पैसे जप्त केले असल्याचा व्हिडिओदेखील पत्रकार परिषदमध्ये प्रसिद्ध केला.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये १.८० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगितले. पैसे देऊन मत विकत घेण्यासाठी भाजपकडे एवढा काळा पैसा आहे का?’, असा सवालही सुरजेवाला यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावरून चौकीदार चोर आहे, हे सिद्ध होत नाही का?’, अशा शब्दात सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री खांडू आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या आणखी नेत्यांचा समावेश आहे. यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच मोदी हे गप्प का आहेत? निवडणूक आयोगाने देखील मौन बाळगले आहे. अजुनही त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही? असाही प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *