Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर राहुल गांधी यांच्या फोटोमुळे सोनिया गांधी नाराज

काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर राहुल गांधी यांच्या फोटोमुळे सोनिया गांधी नाराज

नवी दिल्ली: ‘गरिबी हटाओ’चा नारा देत मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. मात्र या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर राहुल गांधी यांचा छोट्या आकाराचा फोटो लावल्यामुळे सोनिया गांधी प्रचंड नाराज झाल्या आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य राजीव गौडा यांना बोलावून दाखवत त्यांनी कान उघडणी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मोठया गर्दीचा फोटो असून राहुल गांधी आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्हा तळाला दाखवले आहे. मुख्यपृष्ठाची ही डिझाईन सोनियांना आवडली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल गांधी आणि निवडणूक चिन्हाचा फोटो ठळक व मोठा असावा असे सोनिया गांधी यांचे मत आहे.

जाहीरनामा प्रकाशनावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे व्यासपीठावर उपस्थितीत होते. मात्र सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट जाणवत होती.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गरीबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपयांसह सहा महिन्यात २२ लाख सरकारी नोकऱ्यांची पदे भरण्यासारख्या मोठया घोषणा राहुल यांनी केल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *