उमेदवार जाहीर करण्याच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकर पुढे
मुंबई, दि. १७: अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षातर्फे उभं राहणाऱ्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात ३० उमेदवारांची नावं आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या समाजाचा उल्लेखही केला आहे.
