Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माझा उमेदवार वसंत मोरे देणारा आहे, हडप करणारा नाहीये; हडपसर इथल्या सभेत राज ठाकरेंनी मतदारांना केले आवाहन

माझा उमेदवार वसंत मोरे देणारा आहे, हडप करणारा नाहीये; हडपसर इथल्या सभेत राज ठाकरेंनी मतदारांना केले आवाहन

हडपसर: माझा वसंत मोरे तुम्हाला जे जे वचन देईल ती ती वचन तो निवडून आल्यावर पाळेल ह्याची मला खात्री आहे. माझा उमेदवार वसंत मोरे देणारा आहे, हडप करणारा नाहीये. एका चांगल्या भवितव्यसाठी आणि सबळ विरोधी पक्षासाठी माझ्या उमेदवारांना निवडून द्या असे म्हणत काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथील सभेत मतांचा जोगवा मागितला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१) तुम्हाला अपेक्षित असलेला विकास महाराष्ट्रात असो की देशात असो, ज्या विकासाची तुम्ही अपेक्षा करत आहात, हे जेंव्हा तेव्हाच शक्य होईल जेंव्हा देशातील नागरिक निवडणुकीला गांभीर्याने घेतील.

२) निवडणुकीकडे मी नगरसेवक, आमदार खासदार निवडून येणं एवढ्यापुरतं पहात नाही, निवडून आलेल्यांनी जे वचन देऊन ते निवडून आले आहेत त्याची जाणीव जर मतदार ह्या निवडून आलेल्यांना करून देणार नसतील तर देशात काय किंवा राज्यात काय बदल घडणार नाही.

३) मी एका गोष्टीची वारंवार आठवण करून देत आहे की; देशात आर्थिक मंदीचं सावट आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसतोय आणि बसेल. लक्षात ठेवा की मी तुम्हाला घाबरावयला किंवा विरोधाला विरोध करायला म्हणून हे नाही सांगत आहे. मी तुम्हाला जागं करायचा प्रयत्न करतोय.

४) मतदानाच्या आदल्या दिवशी कोण किती पैसे वाटतोय, कोण जेवणावळी घालतोय, कोण कोणाच्या नात्यातला जातीतला आहे ह्यावर आपण मतदान करतोय म्हणून आपला विकास होत नाहीये; ह्याचा विचार ह्या निवडणुकीच्या वेळेस तरी करणार आहोत का?

५) सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यांच्यावर जर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष नसेल तर तुमच्यावर वरवंटा फिरला म्हणून समजा.

६) जे माझ्याकडून आश्वासन पूर्ण होणार नाही ते आश्वासन मी तुम्हाला देणार नाही.

७) शिवसेना म्हणते १० रुपयात जेवण देऊ तर भाजप म्हणतंय की आम्ही ५ रुपयात जेवण देऊ. शिवसेना भाजप युतीत आहे पण आश्वासन देण्यापुरतं ह्यांच्यात पायपोस नाही.

८) माझ्या उमेदवारांच्या मनात आणि पोटात आग आहे,त्यांना तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांना तुमच्यासाठी लढायचं आहे . माझ्या वसंत मोरेने जर नगरसेवक म्हणून काम केलं आहे ते काम पुण्यात कुठेही झालं नसेल.

९) जर बदल घडवायचा असेल तर अशी माणसं विधानसभेत हवी ज्यांना तुमच्याबद्दल तळमळ आहे आणि काही करून दाखवण्याची धमक आहे, आणि मला अभिमान आहे अशी माणसं माझ्याकडे आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *