Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप

उरण दि.१६(विठ्ठल ममताबादे): स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवार दि.१७ मे २०२१ रोजी होणाऱ्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समर्पित कोविड आरोग्य केंद्र बोकडविरा, उरण या केंद्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, व कोविड पेशंट यांच्या साठी PPE किट , N95 मास्क, हॅन्डग्लोज असे वैद्यकीय साहित्य ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती रमेश भास्कर म्हात्रे आवरे उरण यांच्या मार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे आणी डॉ. स्वाती म्हात्रे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे साहेब, डॉ. अरुणकुमार भगत-आरोग्य सभापती महानगर पालिका पनवेल, संतोष पवार-कर्मचारी नगर पालिका उरण, सुनील भोपतराव, नरेंद्र पाटील, आदित्य भगत, योगेश कडू आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *