Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

रस्ते दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. करंजा ते कासवले पाडा, सुरकीचा पाडा ते करंजा, चारफाटा परिसर येथे रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून याचा त्रास नागरिकांना, दैनंदिन प्रवास करणारे प्रवाशी, ग्रामस्थांना होत असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) रायगड जिल्हा परिषद, चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत जिल्हा जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडून ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हद्दीत असलेला करंजा ते कासवला पाडा पर्यंत रस्त्याचे (दुरुस्तीकरण) मंजूर झालं होतं. पण या रस्त्याचे कामही अर्धवट झाले आहे. सुरकीचा पाडा ते करंजा नाका पर्यंतचा रस्ता, चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील उरण चारफाटा ते करंजा रोडवर अनेक मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्यातील लहान मोठे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सदर अपघातप्रवण रस्त्यांचे दुरुस्तीकरण ग्रामपंचायतीने त्वरित करावे यासाठी ओ.एन.जी.सी./सिडकोच्या CSR फंड किंवा इतर योजना, माध्यमांची मदत घ्यावी व रस्त्याचे दुरुस्तीकरण करावे अशी मागणी चाणजे हद्दीतील ग्रामस्थांसह चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता रायगड जिल्हा परिषद-अलिबाग, चाणजे ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे. काम त्वरित पूर्ण न केल्यास चाणजे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चाणजे शेतकरी संघर्ष समिती/चाणजे परिवर्तन विकास संघटना तसेच येथील बाधित नागरिकांनी दिला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *