Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रायगडाचा सर्वांगीण विकास

रायगडाचा सर्वांगीण विकास

रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *