Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

नवी दिल्ली, दि. २ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किनाऱ्याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ ने एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *