मुंबई, दि. २७: माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकत्याच जाहीर व मंजूर झालेल्या अर्थसंकल्पावर असूद ओढत त्यांची चिरफाड केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे.
१. नागपूर दंगलीची सारवासरव मुख्यमंत्री करत आहेत, आज ज्याला मुख्यमंत्रीपदाचे कोंब फुटले होते ते कोंब काही गेले नाही. आता मुख्यमंत्री यांना असं वाटतं असेल की याला एवढ देऊनही असं सुरु आहे.
२. एकनाथ संभाजी शिंदे या नावाचा शॉर्ट फॉर्म करत ‘एसंशी’ ही शिवसेना नाही तो एक गट आहे.
३. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी या सरकाराची गत झाली आहे, वाटेल त्या घोषणा करायच्या पण सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पीय बजेटमधून काहीच मिळालं नाही.
४. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं बोंबलणारे टोपी घालून सौगात ए-मोदी वाटायला जात आहेत. आता हे सौगात ए मोदी यांनी सुरू केलं आहे. ३२ हजार कार्यकर्ते हे वाटप करणार आहेत, पण हे सौगात ए सत्ता आहे. बटेगे तो कटेंगे म्हणणारे आता त्यांना वाटणार आहे, आता हे टोपी घालून सौगात कशी वाटायला जातात हे बघायचं आहे. होळीला मुस्लिमांबद्दल बोंब मारणारे आता निवडणुकीवेळी पुरणपोळी देत आहेत. सौगात हे सत्ता फक्त बिहार निवडणुकीच्यापूर्ती आहे की पुढे सुद्धा सुरु राहणार आहे. आता, भाजपने हिंदुत्व सोडल हे त्यांनी सांगावं. आम्ही भाजपला म्हणालो होतो भाजपाने झेंड्यातून हिरवा रंग काढावा, त्यांनी तो रंग काढला नाही.
५. दिशा सालियन प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. जे प्रकरण मला माहित नाही, त्याबद्दल मी काय बोलू?
६. मनसेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जात असल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. कारण, त्यांना कळते की या शिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
७. विधिमंडळाचं अभिवेशन संपलं पण अद्यापही विरोधी पक्षनेता नेमण्यात आला नाही. सत्तेचा माज यालाच म्हणतात, तुमचं सरकार जनतेचा आवाज कसा दाबताय हे आम्ही राज्यपाल महोदयांना सांगितलं आहे. विरोधी पक्षनेते पद संवैधानिक पद आहे, तरीसुद्धा दिले जात नाही, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.
८. प्रशांत कोरकटकरकडून हे सर्वजण निबंध लिहून घेतील आणि त्याला सोडून देतील. तुम्ही सोलापूरकरला साधा समन्स देखील पाठवला नाही. कोरटकरला हे सोडून देतील.
त्या शाळेमध्ये बलात्कार झाला होता बदलापूरची शाळा तो संस्थाचालक आपटे कुठे आहे?
९. संभाजी भिंडे यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात केलेल्या टीपण्णीवरुन उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी कोणत्या झाडाचा आंबा खाल्ला आहे मला अजून कळालं नाही.
१०. वाघ्या कुत्र्याबद्दल सगळ्या इतिहासकारांचा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेतला पाहिजे. पण त्याचं काय करायचं ते करा पण त्याआधी अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं, ज्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं? याची आठवणही ठाकरेंनी करुन दिली. याचच स्मरण करावं लागतंय हे दुर्दैवी आहे, मी त्यांना स्मरणपत्र देणारा कोण मोठा लागून गेलो?
