टोरेसशी(Torres) संबंधित मुंबई आणि जयपूर मधील १३ ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी
मुंबई, दि. २५: काही दिवसांपूर्वी मुंबईतील टोरेस कंपनीने अचानक आपला गाशा गुंडाळला आणि एकच कल्लोळ उडाला. यावेळी कंपनीच्या विविध स्कीम मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांना पाचारण केलं आणि या कंपनीच्या म्होरक्यांची धरपकड सुरु झाली. गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने आपला मोहरा या प्रकरणाकडे वळवला आणि तपासाला सुरुवात केली. अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्या अंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने मुंबई आणि जयपूर मध्ये मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. टोरेसची पालक कंपनी असलेल्या प्लॅटिनम हर्न या खाजगी कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना उघडकीस आल्यामुळे हे छापे टाकण्यात आले. कंपनीने दागदागिने आणि रत्नांच्या गुंतवणुकीवर दोन ते नऊ टक्के साप्ताहिक परतावा देण्याचं आश्वासन देऊन गुंतवणुकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप असून संबंधित बँक खात्यातले २१ कोटी ७५ लाख रुपये गोठवले गेले आहेत.
Source – AIR
