अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना टाटा समूहाकडून प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर
अहमदाबाद, दि. १२: अहमदाबाद येथे आज दुपारी लंडनसाठी उड्डाण केलेल्या एयर इंडिया च्या विमानाला मोठा अपघात झाला व यात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. आज झालेल्या विमान अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समुहाने प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्चही समूह उचलणार असून बीजे महाविद्यालयाचं वसतीगृह देखील बांधून देणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. १२ ते १४ जून दरम्यानच्या प्रवासाची तारिख बदलायची असेल किंवा रद्द करायची असेल तर कुठलंही शुल्क न आकारण्याचा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे.
Source – AIR
