शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपन्न
मुंबई, दि. १२: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे लागलेला ‘तारीख पे तारीख’ चा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याला कारण ठरली आहे शिवसेनेच्या चिन्हा बाबतची सर्वोच्च न्यायालयात पार पडलेली आजची सुनावणी. मागील तारखेला न्यायालयाकडून आजच्या तारखेला सुनावणी सुरु करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने थेट नव्या वर्षातल्या जानेवारीच्या २१ ची तारीख देत ठाकरे गटाचा हिरमोड केला आहे. या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पक्षाचं नाव व चिन्हाची सुनावणीहि सुरु होणार आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिलं आहे. हि सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्यापीठासमोर सुनावणी सुरु आहे.
