Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये …

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये …

सोलापूर : सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर या प्रतिस्पर्ध्यांची आज सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट झाली.

सुशीलकुमार शिंदे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी बालाजी सरोवर येथे आले होते. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे नाश्ता करत होते.

सुशीलकुमार शिंदेनी प्रकाश आंबेडकर यांच्या टेबलाजवळ जात त्यांची भेट घेत दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रकाश आंबेडकर व सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत पहावयास मिळणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *