Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘अंधाधून’ चित्रपटाने चीनमध्ये ओलांडला १५० कोटींचा टप्पा

‘अंधाधून’ चित्रपटाने चीनमध्ये ओलांडला १५० कोटींचा टप्पा

भारतात २०१८ मध्ये अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. त्याचवर्षी सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाने स्थान मिळवले होते. चीनमध्ये गेल्याच आठवड्यात ‘पिआनो प्लेअर’ या नावाने अंधाधून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

चीनच्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तुफान कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरव्दारे दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५.३८ कोटींची कमाई केली, तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात तब्बल १५०.५१ कोटींची कमाई केली असल्याचे सांगितले आहे.

‘अंधाधून’या चित्रपटात आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. तसेच हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *