Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राहुल गांधींच्या मुलाखतीनंतर सुबोध भावे यांचं फेसबुकद्वारे स्पष्टीकरण

राहुल गांधींच्या मुलाखतीनंतर सुबोध भावे यांचं फेसबुकद्वारे स्पष्टीकरण

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. याच कार्यक्रमात मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी राहुल गांधींचा बायोपिक करणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर सुबोध यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी अभिनेता सुबोध भावेने राहुल गांधी यांची मुलखात घेतली होती. या मुलाखतीनंतर अनेक चर्चांना उधाण आल्यानं सुबोधनं आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कार्यक्रम हसता खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून राहुल गांधींचा चरित्रपट करायचा विषय काढला’, अशा आशयाची फेसबुक पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी केली आहे.

“मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत. मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर हि जबाबदारी देणाऱ्या उध्दव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे.

आजपर्यंत मी मोहनजी भागवत,शरद पवार साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब,राज साहेब,रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानी भेटलो आणि त्यांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर आहे.काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

आता मुद्दा त्यांच्यावर चरित्रपट करायचा!

कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला.”

सुबोध भावे सध्या शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आलं होत त्यातच राहुल गांधींच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार की काय अशाही चर्चांना रंगत होत्या. मात्र अशा सगळ्या चर्चेना सुबोध भावेंनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे स्वल्पविराम दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *