Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तुम्ही पळू शकता पण लपू शकत नाही, सत्यामध्ये खूप ताकद आहे – राहुल गांधी

तुम्ही पळू शकता पण लपू शकत नाही,सत्यामध्ये खूप ताकद आहे – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. राफेल लढाऊ विमान व्यवहाराबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर काँग्रेसचा विश्वास नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.

‘श्री मोदी तुम्ही पळून जाऊ शकता. पण लपू शकत नाही. तुमचे कर्म तुमचा पाठलाग करणे सोडणार नाही. देश तुमचा आवज ऐकू शकतो. सत्यामध्ये खूप ताकद आहे. मी तुम्हाला भ्रष्टाचारावर चर्चा करण्याचे आव्हान देतो.’ असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार आणि विदेश नीतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *