Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर, उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर प्रियंका पाटील यांना साहसी क्रीडा पुरस्कार

दरवर्षी महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारने सन्मानित करते.महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.२०१७ – १८ यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार मल्लखांबसाठी योगदान देणारे उदय देशपांडे यांना जाहीर झाला आहे. तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना देण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे येत्या १७ फेब्रुवारीला राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे-वॉटरपोलो, पोपट महादेव पाटील-कबड्डी, राजेंद्र प्रल्हाद शेळके-रोईंग, दिपाली महेंद्र पाटील-सायकलिंग, निखिल सुभाष कानेटकर व सत्यप्रकाश माताशरन तिवारी -बॅडमिंटन, स्वप्नील सुनील धोपाडे व मृणालीनी वैभव औरंगाबादकर -बुध्दीबळ, उमेश रमेशराव कुलकर्णी व बाळकृष्ण मलप्पा भंडारी – तायक्वोंदो, संजय बबन माने- कुस्ती, डॉ.भूषण पोपटराव जाधव – तलवारबाजी, अमेय शामसुंदर जोशी व सागर श्रीनिवास कुलकर्णी -जिम्नॅस्टिक्स या खेळाडूंना २०१७ – १८ यावर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालाय.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *