स्त्री जीवनावर प्रकाश टाकणारा ‘व्हूज नेक्स्ट’ लघुपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित
देशात ऍसिड हल्ला-बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी त्या पीडित मुलीने काय करावं व काय करू नये. यावर भाष्य करणारा ‘व्हूज नेक्स्ट’ हा लघुपट १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘व्हूज नेक्स्ट’ या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हे दोन्ही अभिजित चौधरी यांनी केले आहे. व्हूज नेक्स्ट हा स्त्रीप्रधान लघुपट आहे. या लघुपटामध्ये अभिनेत्री रुपाली भोसले हि प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर लघुपट आहे.