Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ‘राष्ट्रवादी’ची रणनीती ठरणार

NCP Clock PNG

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ‘राष्ट्रवादी’ची रणनीती ठरणार

लोकसभा निवडणुकीला अगदी काही काळ शिल्लक असल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

या बैठकीत पक्षाच्या वाटय़ाला येणारे मतदारसंघ, काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी त्याचप्रमाणे काही जागांबाबत निर्माण झालेला पेच इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जागावाटपामध्ये प्रामुख्याने अहमदनगर व औरंगाबाद या दोन जागांचा वाद आहे. त्या जागेबाबतही आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. देशातील राजकीय वातावरण सध्या बदललेले आहे, अशा वेळी पवार यांनी लोकसभेत असणे आवश्यक आहे, असे पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे मत आहे, असे पाटील म्हणाले. आज होणाऱ्या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार, ओबीसींचे नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. मजिद मेमन, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, अनिल देशमुख,
डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *