यंदा दहावीचा निकाल धक्कादायक, गेल्यावर्षीपेक्षा १२.३१ टक्क्यांनी घट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला. या वर्षी दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भायतील माहिती दिली. त्यापुढे म्हणाल्या की गतवर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल १२.३१ टक्क्यांनी कमी लागला आहे.
विद्यार्थी आपला निकाल दुपारी १ नंतर पाहू मंडळाच्या संकेतस्थळावर पाहू शकतात. बारावीच्या निकालाचीच पुनरावृत्ती पुनः झाली असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. त्याचे कारण असे की निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच विभागवार विचार केला तर कोकण विभागाने यंदाही सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
या वर्षी संपूर्ण राज्यात यंदा १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी सुमारे १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षीच्या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
दहावीचा विभागनिहाय निकाल
कोकण – ८३.८८ टक्के
कोल्हापूर – ८६.५८ टक्के
पुणे – ८२.४२ टक्के
मुंबई – ७७.०४ टक्के
नाशिक – ७७.५८ टक्के
औरंगाबाद – ७५.२० टक्के
लातूर – ७२.८७ टक्के
अमरावती – ७१.९८ टक्के
नागपूर – ६७.२७ टक्के
