बिहारमध्ये विशेष मतदार याद्या पुनरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
नवी दिल्ली, दि. ७: बिहारमध्ये विशेष मतदार याद्या पुनरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांचं पीठ ही सुनावणी घेईल. या प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या मसुदा मतदार याद्यांवर १ सप्टेंबरची मुदत संपल्यानंतर आलेले दावे आणि हरकतीही विचारात घेऊ, असं निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर ही मुदत वाढवायला या पीठानं गेल्या आठवड्यात नकार दिला होता.
Source – AIR
