पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी कॉंग्रेसचा टोला
मुंबई, दि. वादग्रस्त ठरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात तब्बल ३७ वर्षांपेक्षा जास्त काळसेवा बजावलेल्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तत्पूर्वी त्यांनीही मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली.
२०१९ साली राज्यात ठाकरेंचं सरकार बनत असताना कथितरीत्या घडलेल्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला वादात सापडल्या होत्या. मात्र २०२२ साली राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर त्या पुन्हा सरकारच्या लाडक्या झाल्या. नेमका हाच धागा पकडत कॉंग्रेस ने ‘सत्ताधाऱ्यांचा ट्रू-कॉलर आज सेवा निवृत्त झाला..!’ अशी एक पोस्ट समाजमाध्यमांवर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात.
https://x.com/INCMaharashtra/status/2007445371065380923?s=20
