Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हे’ आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक

‘हे’ आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस – भाजपा पाठोपाठ शिवसेनेने देखील आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने आज आपल्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची नावे स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गिते, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरै, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसळकर, डॉ. निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे-पाटील, वरुण सरदेसाई आणि राहुल लोंढे यांच्या नावांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *