उद्याच्या संयुक्त किसान मोर्चातर्फे आयोजित देशव्यापी शेतकरी आंदोलनात शिवसेनाही होणार सामील
मुंबई, दि.२५: संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या देशव्यापी शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह, १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करुन कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या या दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारं पत्र शेतकरी संघटनांनी, १२ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं होतं.
