अजून एका अपक्ष उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा; एकूण संख्याबळ झालं ६२
मुंबई: सत्तेच्या सारीपाटावर आता नवे नवे डाव मांडण्यास भाजप आणि शिवसेनेकडून सुरुवात झाली आहे. अपक्ष आमदारांनाही गळाला लावण्याचे दोन्ही पक्षांकडून काम चालू आहे. आज शिवसेनेला अजून एक अपक्ष आमदाराने पाठिंबा दिला आहे. साक्री विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत पाठिंब्याचे पत्र त्यांच्या हाती सोपवले. आता शिवसेनेचे एकूण संख्याबळ ६२ वर पोहोचले आहे. मंजुळा गावित यांनी भाजपच्या मोहन सूर्यवंशी यांचा ७ हजार मतांनी पराभव केला.
