Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपला धक्का देत, बीडमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादीचा प्रचार करणार

भाजपला धक्का देत, बीडमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादीचा प्रचार करणार

बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटे बोलत होते.

बीड लोकसभा मतदारसंघात राजकीय भूमिका ठरवण्यासाठी भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी आपली भूमिका मांडली.

शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत काम करत राहील, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली.

जनावरांच्या छावण्यात राजकारण करणाऱ्या पंकजा मुंडे ह्या मुंडे साहेबांच्या वारस असू शकत नाहीत. तसंच साडेचार वर्षात तीन वेळा आपल्या मंत्रीपदाचा पंकजा मुंडे यांनी कसा विरोध केला याचा लेखाजोखा देखील त्यांनी वाचला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे चांगले आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी साथ देणार असल्याचंही मेटेंनी जाहीर केलं.

निवडणूक काळात थेट भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे आता विनायक मटेंना फायदा होतो की तोटा हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *