Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शत्रुघ्न सिन्हा भाजपमधून खामोश, आता लढणार काँग्रेसकडून

शत्रुघ्न सिन्हा भाजपमधून खामोश, आता लढणार काँग्रेसकडून

गेल्या बऱ्याच काळापासून भाजप पासून मनाने दूर गेलेले शॉटगन सिन्हा म्हणजेच विद्यमान भाजप खासदार व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर तसेच भाजपच्याही सध्याच्या पक्षीय स्थितीवर टीका केली. भाजप चा प्रवास लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे कसा होताना आपण पाहिला यावरही ते या प्रसंगी बोलले.

भाजपच्या स्थापनादिनीच आपल्याला पक्ष सोडावा लागत असल्याचे अतीव दुःख होत असल्याचे ते म्हणाले. सध्या भाजपमध्ये ‘वन मॅन आर्मी आणि टु मॅन शो’ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांनी तोफ डागली. पक्ष प्रवेश केल्याकेल्या आज त्यांना पटना साहिब मधून उमेदवारीही देण्यात आली. त्यांच्याविरोधात तेथून भाजपचे रविशंकर प्रसाद हे निवडणूक लढवत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *