Video : पहा वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी कशा प्रकारे गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा दिवस गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्ष दिन म्हणूनही देशभरात विशेषतः देशाच्या हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांत मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. आजच्या या सणाच्या दिवशी पुरी, ओडिशा येथील जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळू शिल्पाद्वारे तमाम भारतवासीयांना गुढीपाडवा/उगाडी व नववर्षाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वाळू शिल्पावर त्यांनी “स्वागतम # राष्ट्रीय नव वर्ष” असे लिहिले आहे.