Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल व इनरव्हील क्लब, पनवेल तर्फे महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल व इनरव्हील क्लब, पनवेल तर्फे महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा

(पनवेल : प्रतिनिधी हृषिकेश ठाकूर)

“यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:” म्हणजेच जेथे स्त्रीची पूजा केली जाते, तिथे प्रत्यक्ष परमेश्वर रममाण होतात आणि म्हणूनच समाजातील विविधस्तरावर, विविधक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या स्त्रीयांचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन व इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने को.ए.सो. पनवेल संकुलात दि. 09.03.2019 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. बाळाराम पाटील व प्रमुख अतिथी श्रीमती फाल्गुनी मेहता होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष श्री. व्ही. सी. म्हात्रे यांनी महिला दिनाचे महत्व सांगून तो का व केव्हा पासून साजरा केला ते सांगितले. प्रास्ताविकात इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षा सौ. वैशाली म्हात्रे यांनी गोष्टी मधून स्त्री मधील विविध गुणांबद्दल सांगितले.
सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यात शिक्षिका, ब्युटीशीयन, नृत्यक्षेत्र, डॉक्टर, समाज सेविका, गायिका, लेखिका त्याच प्रमाणे अगदी स्वतःच्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालक महिलांचाही गौरव करण्यात आला. ज्याप्रमाणे पाणबुडे समुद्राच्या तळाशी शिंपल्यातून मोती शोधून आणतात त्याच प्रमाणे श्री. व्ही सी. म्हात्रे यांनी या मोत्यांचा शोध घेऊन त्यांना गौरविले.

कार्यक्रमास आमदार श्री. बाळाराम पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन व को. ए. सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळा पनवेल चे अध्यक्ष श्री. व्ही. सी. म्हात्रे, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षा सौ. वैशाली म्हात्रे, इनरव्हील क्लबस इन इंडिया अँड श्रीलंकाच्या Vice – President फाल्गुनी मेहता, श्री प्रमोद ठाकूर, शे. का. प. पनवेल महानगर पालिका प्रांत चिटणीस श्री. गणेश कडू, पनवेल महानगर पालिका नगरसेविका सौ. हेमलता म्हात्रे, श्री. कल्पेश परमार सौ. परमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *