Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मधुबाला : सौंदर्याच्या राणीला गुगल ची अनोखी आदरांजली

Google Doodle Madhubala

मधुबाला – सौंदर्याची राणी

कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्‍य असणाऱ्या तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांची आज ८६ वी जयंती आहे. गुगलने आजच्या दिवशी या सौंदर्याच्‍या राणीची आठवण म्‍हणून एक खास डुडल तयार केले आहे. या डुडलच्या माध्यमातून गुगलने मधुबाला यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. गुगलने तयार केलेल्या डुडलमध्ये मधुबाला नृत्याची एक अदा देताना दिसत आहे.

मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. मधुबाला यांचे मूळ नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी असे होते.मधुबाला यांनी ‘बसंत’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘नीलकमल’ या चित्रपटात मधुबाला या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसल्या होत्या. नीलकमल चित्रपटानंतर मधुबाला ह्या ‘सौंदर्याची राणी’ या नावाने ओळखल्या जावू लागल्या.

मधुबाला यांना हृदय विकाराचा त्रास होता. अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *