राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर भडकलेले संजय राऊत म्हणाले, “इथे तडजोड नाही”
आज नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅली मध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांचं उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे समस्त देशाचे लक्ष लागून होते.
थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटर व फेसबुक वर राहुल गांधी यांना सूचक इशारा देत शिवसेनेची सावरकरांबद्दल भूमिका स्पष्ट केली. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत.
जय हिंद”.
आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
पुढे दुसऱ्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
जय हिंद”