कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका
नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, असं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आता कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याला कितवं आश्चर्य म्हणणार, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
